Home आरोग्य राज्यात कोरोनाचा गुणाकार सुरू, आज दिवसभरात ८२ रुग्ण पॉसिटीव्ह : राजेश टोपे

राज्यात कोरोनाचा गुणाकार सुरू, आज दिवसभरात ८२ रुग्ण पॉसिटीव्ह : राजेश टोपे

0

राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये खुप झपाट्याने वाढ होत आहे. काल रात्री ११ पर्यंत राज्यात कोरोनाचे २२० रुग्ण होते. मात्र आज सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत यात ७२ रुग्णांची वाढ झाली असून तो आकडा आता ३०२ वर जाऊन पोहचला आहे. महत्वाची बाब म्हणजे राज्यातील कोरोना चाचण्यांची क्षमता देशात सर्वाधिक महाराष्ट्रात असून १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज ५५०० चाचण्या करू शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात आतापर्यंत ६३३२ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी ६९११ जणांचे नमुने संपूर्ण निगेटिव्ह आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चाचण्यांची सुविधा वाढविण्यासाठी सुरूवातीपासून केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात  आला.
मुंबईतील खासगी रुग्णालयातील उपलब्ध झालेल्या टेस्टींग लॅबमधील आकडेवारी उपलब्ध झाल्यामुळे मुंबईत एका दिवसात ५९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या सर्व रुग्णांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने आता राज्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ३०२ वर जाऊन पोहचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५९नवे रुग्ण मुंबई, पुणे २, ठाणे २, केडीएमसी २, नवी मुंबई २, वसई विरार २ असे एकूण ७२ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे उच्चभ्रू वस्तीतील हा आजार आता झोपडपट्टी आणि चाळीत पसरल्याने मुंबईकारांमध्ये खूप चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.