Home महाराष्ट्र आठवडाभर आधी मुलीचं लग्न लागत नाही तोच “डॅडी” ला कोर्ट म्हणाले, ”...

आठवडाभर आधी मुलीचं लग्न लागत नाही तोच “डॅडी” ला कोर्ट म्हणाले, ” चुकीला माफी नाही!”

0

मुंबईमध्ये दगडी चाळीत राहणारा गुंड अरुण गवळी याला नागपूर खंडपीठाने पॅरोल वाढवून देण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे तसेच लवकरात लवकर आत्मसमर्पण करा असे आदेश दिले आहेत.

अरुण गवळीने पॅरोल वाढवून देण्यासाठी अर्ज केला होता. यावेळी त्याने आपण कोणतेही गैरकृत्य तसंच लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचा युक्तिवाद केला. पण न्यायालयाने चांगली वर्तवणूक किंवा नियमांचे उल्लंघन न केल्याच्या धर्तीवर पॅरोल वाढवला जाऊ शकत नाही असे सांगितले. तसेच पॅरोल वाढवण्यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याचे खंडपीठाने नमूद केले. यामुळे अरुण गवळीला पुन्हा कारागृहात परतावे लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी अरुण गवळी यांची कन्या योगिता हिचा विवाह सोहळा दगडी चाळीत पार पडला या विवाह सोहळ्यासाठी अरुण गवळी यांना पॅरोल देण्यात आला होता. त्यानंतर गवळी यांनी पॅरोल वाढवून द्यावी अशी मागणी केली होती. तसेच गेल्या काही दिवसातील वागणू पाहता ती चांगली असल्याचे सांगत त्यांनी पॅरोल वाढवण्याबाबत म्हटले होते. परंतु हायकोर्टाने त्यांच्या या मागणीला नकार दिला आहे. नागपूर मधील सेंट्रल तुरुंगात असणाऱ्या गवळी यांना तळोजा मधील जेलला सेंडर होण्यासाठी सांगण्यात आले आहे.

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. पत्नीच्या आजारपणाच्या कारणाने अरुण गवळी यांना 45 दिवसांसाठी पॅरोलवर कारागृहातून बाहेर येण्याची परवानगी देण्यात आली होती यानुसार एप्रिल महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 27एप्रिलला त्याने कारागृहात आत्मसमर्पण करायचे होते. मात्र यावेळी 3 मे पर्यंत लॉकडाउन वाढल्याने त्यांच्या पॅरोल मध्ये 10 मे पर्यंत वाढ करण्यात आली होती.