Home महाराष्ट्र दादा भुसे नकली कृषिमंत्री, दुकानावरची धाड फक्त दिखावा : अनिल बोडें

दादा भुसे नकली कृषिमंत्री, दुकानावरची धाड फक्त दिखावा : अनिल बोडें

0

सद्याचे कृषिमंत्री हे नकली धाडी टाकतात, नाटक नौटंकी करतात पण असे करून काही फायदा नाही. असल्या सर्व ठरलेल्या नकली धाडी टाकून काही होणार नाही”, अशी टीका माजी कृषिमंत्री अनिल बोडें यांनी केली आहे.

कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी काल शेतकरी बनून दुकानांमध्ये युरिया खतं मिळते की नाही हे तपासण्यासाठी स्टिंग ऑपरेशन करत पोलखोल केली.शेतकऱ्यांना खतं, बियाणे मिळतात की नाही हे पाहण्यासाठी दादाजी भुसे स्वतः शेतकरी बनून औरंगाबादेतील एका दुकानात गेले. त्यावेळी त्या दुकानदाराने खते शिल्लक असतानाही देण्यास नकार दिला. यानंतर स्वत: कृषीमंत्र्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांसोबत त्या दुकानाचा आणि गोदामाचा पंचनामा केला.दादाजी भुसे यांच्या याच स्टिंग ऑपरेशनवरुन अनिल बोंडे यांनी कृषीमंत्र्यांवर निशाणा साधला. कृषीमंत्री नाटक नौटंकी करतात, त्याला काहीही अर्थ नाही. ही धाड पूर्णपणे मॅनेज होती असा आरोप अनिल बोंडेंनी कृषीमंत्र्यांवर केला.

यावर दादा भुसे यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, “
अनिल बोंडेचे हे वैयक्तिक मत असेल, त्यांनी त्यांच काम करावं धाड मॅनेज असेल तर चांगली गोष्ट आहे.मॅनेज का होईना पण आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात जो संदेश द्यायचा आहे. तो आम्ही दिलेला आहे. उद्या प्रत्येक शेतकरी प्रत्येक दुकानात जाऊन यांची चौकशी करणार आहेत. त्यामुळे आम्ही केलेलं काम हे नौटंकी आहे कि नाही हे जनता ठरवेल.