
कोरोनामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे, अश्या परिस्थितीमध्ये अनेक ऊसतोड मजूर अडकून पडले आहेत. दरम्यान या मजुरांना घरी पाठवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
मुंडे म्हणाले, “राज्यामधील ऊसतोड बांधवांना त्यांच्या स्वगृही पाठवण्याच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार! ऊसतोड बांधवांनो, घरी परतताना सुखरुप या, प्रशासनाला सहकार्य करा, महिला व लहान बालकांना प्राधान्याने घरी पाठवा. राज्यातील ३८ साखर कारखाने अंतर्गत एक लाख ३१ हजार पाचशे ऊसतोड कामगारांना आपापल्या घरी सोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.यामध्ये ज्या ऊसतोड कामगारांचे १४ दिवस क्वॉरंटाईनचे पूर्ण झाले आहेत. अशा ऊसतोड कामगारांची वैद्यकीय चाचणी करून त्यांच्या घरी सोडण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे”.
या संदर्भात भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ऊसतोड कामगारांचा प्रश्न मांडत होत्या त्यांच्यासाठी तातडीने निर्णय घेतला जावा अशी मागणी सरकारकडे करत होत्या.उद्याच्या उद्या निर्णय जाहीर करण्यात यावा असंही त्या म्हणाल्या होत्या. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस असून अनेक मजूर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अडकले आहेत. पावसामुळे त्यांच्या अडचणीत भर पडत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी त्यांचा प्रश्न मांडत उद्याच निर्णय घेण्याची मागणी केली होती.