
राज्यात मृतांची संख्या आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. आम्ही २.५ ते ३ टक्के मृतांचा आकडा अपेक्षित करत होतो. मात्र मृतांचा आकडा ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
“राज्याचा मृत्युदर ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. याबाबत आज बैठक घेवून डॉक्टरांची हाय लेव्हल समिती गठित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ट्रिटमेंट प्रोटोकॉलपेक्षा आणखी काही जास्त केलं पाहिजे का? याबाबत ही समिती अभ्यास करेल”असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकार आता पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट, व्हेंटिलेटर आणि एन 95 मास्क खरेदी करु शकणार नाही.केंद्र सरकार स्वतः संबंधित सर्व साहित्य खरेदी करुन राज्यंना पुरवणार आहे, असं केंद्राने राज्याला कळवलं असल्याचं टोपेंनी सांगितलं आहे.
राज्य सरकारने केंद्राकडे २ हजार १२५ व्हेंटिलेटर, ८ लाख ४१ हजार एन ९५ मास्क, ३ लाख १४ हजार पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटची मागणी केली आहे, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.