Home महाराष्ट्र बाबांनो आता तरी हेल्मेट वापरा… २०१८ मध्ये ४३,६०० लोकांचा मृत्यू

बाबांनो आता तरी हेल्मेट वापरा… २०१८ मध्ये ४३,६०० लोकांचा मृत्यू

0

मागील अनेक दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी भारतात चांगलाच दम बसवला आहे. याबद्दल बऱ्याच लोकांनी रागही व्यक्त केला, अजूनही करीत आहेत. मात्र पोलिसांनी केलेल्या सदर कारवाया एक वेळ योग्यच आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण मागील वर्षी अर्थात २०१८ मध्ये सुमारे ४४ हजार लोकांचा हेल्मेट शिवाय गाडी चालवल्यामुळे मृत्यू झाला आहे.

आणि महत्वाचं म्हणजे २०१७ च्या तुलनेत हा आकडा २१ टक्क्यांनी वाढलेला आहे. एवढेच नाही तर चालकाच्या मागे हेल्मेट न घालता बसलेल्या व्यक्तींच्या मृत्यूचा आकडा सुमारे १५,३६० इतका अवाढव्य मोठा आहे. म्हणूनच याला त्वरित आळा घालणे गरजेचं आहे. वरील आकडेवारी टाइम्स ऑफ इंडियाने वार्ताहरांना दिली आहे.