Home महाराष्ट्र मतांसाठी राजकारण करू नये : मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका…

मतांसाठी राजकारण करू नये : मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका…

0

महाराष्ट्राला एकीकडे विधानसभेचे वेध लागले आहेत तर दुसरीकडे दोन पक्षांमध्ये चढाओढ चालू आहे. नुकत्याच पाकिस्तान बद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टीका करत म्हणाले “शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी कोणतंही वक्तव्य करतांना विचार केला पाहिजे. अशा वक्तव्याने कुणाचा फायदा होईल भारताचा की पाकिस्तानचा ? याचा विचार विचार करून त्यांनी बोलायला हवं. मतांसाठी राजकारण करू नये.” अशी जोरदार टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

काँग्रेसचे दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांचे सुपुत्र सत्यजीत देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या सोहळयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. दरम्यान बोलताना ते म्हणाले “शरद पवार हे ज्येष्ठव समजदार नेते आहेत. त्यांनी कोणतंही वक्तव्य करण्या पूर्वी विचार करायला हवा. पाकिस्तानचं कौतुक केल्याने मुसलमान खूष होऊन आपल्याला मतदान करतील या भ्रमात त्यांनी मुळीच राहू नये. भारतातील मुसलमान देशाभिमानी आहेत यात काही शंका नाही. पवारांनि केलेल्या वक्तव्यातून राष्ट्रवादीची मानसिकता लक्षात येते. निवडणुका तर येत जात राहतील. पण मतं घेण्यासाठी काहीही वक्तव्ये करू नयेत.” असा टोला फडणवीस यांनी पवारांना दिला. त्याच बरोबर उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाचंही त्यांनी मनापासून समर्थन केलं आहे