Home महाराष्ट्र रात्रीस खेळ चाले : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादीचे अजित पवार...

रात्रीस खेळ चाले : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री

0
devendra fadnavis ajit pawar

प्राईम नेटवर्क : राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना आज (शनिवारी) घडली. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज राजभवनात हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.

महाराष्ट्रात आज सकाळी मोठी राजकीय उलथापालथ झालेली पाहायला मिळाली, भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते हे राष्ट्रवादी सोडून भाजप सोबत गेले, यावेळी अजित पवार यांनी उपमुख्य मंत्री पदाची शपथ घेतली आहे, आज सकाळी राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचे आभार व्यक्त करत म्हटले आहे कि, त्यांनी पुन्हा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. त्या बद्दल आभारी आहे, राज्यातील जनादेशाला शिवसेनेने नाकारले आहे, त्यांनी दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे महाराष्ट्राला राष्ट्रपती राजवटीला सामोरं जावं लागलं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली, आज सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, लवकरच विधिमंडळात बहुमत सिद्ध करू असं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषित केलं.