Home महाराष्ट्र धनंजय मुंडेंचं राज्यपालांना पत्र : “व्हॉट्सअप हेरगिरी थांबवा, दोषींना कठोर शिक्षा करा”

धनंजय मुंडेंचं राज्यपालांना पत्र : “व्हॉट्सअप हेरगिरी थांबवा, दोषींना कठोर शिक्षा करा”

0
dhananjay munde

आजकाल व्हाट्सअप म्हणजे धारदार शस्त्र झालं आहे. मात्र ते चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात असल्याने याचा वापर लोक हवा तसा करीत आहेत. गुरुवार रोजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून ‘व्हाट्सअपच्या माध्यमातून देशातील पत्रकार, मानवी हक्क चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनात सुरू असलेली हेरगिरी निषेधार्ह, संतापजनक आहे. ती बंद करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करून संबंधित प्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करावी’ अशी मागणी केली आहे.

व्हाट्सअप नामक हे शस्त्र वापरून मागील काही दिवसांत अनेक कार्यकर्ते व पक्षप्रेमींनी अनेकांवर चिखलफेक केली. यावर बहुधा मुंडे संतप्त असावेत. मीडिया न्यूज नुसार व्हाट्सअपच्या माध्यमातून देशातील नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांच्या फोनमधील कॅमेरा, मायक्रोफोन उघडून त्यातील फोटो, व्हिडीओ, ऑडीओ संवादासारखी वैयक्तिक स्वरूपाची सगळीच माहिती काढून घेतली जात असल्याचे उघड झाले आहे. देशातील लोकसभा निवडणुकीच्या काळात २० एप्रिल ते १० मे या कालावधीत एका विशिष्ट संस्थेने मोठ्या प्रमाणात माहितीची हेरगिरी केल्याचे व त्याबद्दल अमेरिकेतील एका न्यायालयात खटला दाखल झाल्याचे वृत्त एका आघाडीच्या दैनिकाने प्रसिद्ध केले. याकडे मुंडे यांनी राज्यपालाचे लक्ष वेधले आहे अशी माहिती मिळत आहे. मुंडेंच्या या पत्रावर काही कारवाई होते का आणि झाल्यास सर्वसामान्य व्हाट्सअप वापरकर्त्यांवर त्याचा काही परिणाम होईल का हे आता वेळच सांगेल.