Home महाराष्ट्र “पाच वर्षात भाजपने आरक्षण का दिले नाही” म्हणत धनगर समाजाने केला पडळकरांचा...

“पाच वर्षात भाजपने आरक्षण का दिले नाही” म्हणत धनगर समाजाने केला पडळकरांचा निषेध

0

इथून पुढे धनगर समाजाच्या कुठल्याच कार्यक्रमात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना बोलवणार नाहीत, असा निर्णय घेऊन पाच वर्ष केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार होते. मग का आरक्षण मिळाले नाही, असा प्रश्‍न अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा या समितीचे प्रवर्तक उत्तमराव जानक यांनी केला आहे.

“अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा” या समीतीची बैठक आज झाली. समितीत आमदार पडळकर हे सहकारी असल्याचे जानकर यांनी सांगितले. आमदार पडळकर यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर वादगस्त विधान केले. त्यांच्या या विधानाचे राज्यात पडसाद उमटले. धनगर समाजातील नेत्यांनी ही आमदार पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या धनगर समाजाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचेही जानकर यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तर २५ जून रोजी शहर पोलिस स्टेशनला गोपीचंद पडळकर यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती. ‘जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलिस स्टेशन बाहेर ठिय्या मांडणार’ अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. अखेर पोलिसांकडून गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पडळकर यांच्यावर ५०५(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय बोलले होते गोपीचंद पडळकर –

शरद पवार यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरच अन्याय करण्याची त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाच्या बाबत ते सकारात्मक असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं धनगरांसाठी पॅकेज जाहीर केलं होत. पण विश्वासघातामुळे सरकार पडल्यानं त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही.