Home महाराष्ट्र “लाज नाही वाटली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त एक करोड रुपये...

“लाज नाही वाटली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त एक करोड रुपये जाहीर करताना?”- निलेश राणे

0

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्येत जाऊन रामजन्मभूमीचे दर्शन घेतले. तर दर्शन घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली, यावेळी राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून ₹१ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आणि याच घोषणेवरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी ट्वीट करत म्हटले की, “लाज नाही वाटली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राम मंदिरासाठी फक्त एक करोड रुपये जाहीर करताना. मुलाच्या पेंग्विन हट्टासाठी 45 कोटी पण राम मंदिराला फक्त एक कोटी???” 

तर वर्षा बंगल्यावर न जाण्याच्या निर्णयावरून सुद्धा निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. “उद्धव ठाकरे ह्यांना ही भीती आहे की, केंद्र सरकारचे किंवा पवार साहेबांचे हेर त्याठिकाणी असतील. त्यामुळे आतल्या गोष्टी बाहेर जातील आणि मग ठाकरेंचे व्यवहार कळतील त्या भीतीने उद्धव ठाकरे मातोश्री सोडणार नाही”