Home महाराष्ट्र चितळे डेअरीचे संचालक काकासाहेब चितळे यांचे हृदयविकाराने निधन 

चितळे डेअरीचे संचालक काकासाहेब चितळे यांचे हृदयविकाराने निधन 

0

नुकत्याच आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार भिलवडी येथील चितळे डेअरीचे संचालक दत्तात्रय भास्कर चितळे अर्थात काकासाहेब चितळे यांचे वयाच्या ७८व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज अर्थात शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांना देवाज्ञा झाली. काल अर्थात शुक्रवारी रात्री अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

लोकमतच्या रिपोर्टनुसार काकासाहेब चितळे यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते व त्यानंतर वडील बाबासाहेब चितळे यांच्यासोबत चितळे उद्योग समूहामध्ये कार्यरत झाले. याशिवाय त्यांनी जायंट्स वेलफेअर फाउंडेशन, मुंबईचे सदस्य व माजी अध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. तसेच २७ वर्षांपासून भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष, भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक, मुंबई माताबाल संगोपन केंद्राचे आश्रयदाते अशा विविध सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, आरोग्य क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले मोलाचे योगदान दिले आहे. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा निधनवार्तेने महाराष्ट्र दुग्ध उद्योग क्षेत्रात दुःख पसरले आहे.