Home महाराष्ट्र “रोहित चिंता करू नको! मुलांना सांग, मेगाभरती ऑफलाईनच होणार”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“रोहित चिंता करू नको! मुलांना सांग, मेगाभरती ऑफलाईनच होणार”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

राज्यात असलेल्या रिक्त पदांच्या मेगा भरतीची तयारी सुरू झाली असून या मेगाभरतीची तारीख सुद्धा निश्चित झाली आहे. २० एप्रिलपासून राज्य सरकारमध्ये असलेल्या रिक्त पदांसाठी मेगाभारती होणार आहे. त्यासाठी, १लाख ६ हजारांची आरक्षण पडताळणीही पूर्ण झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी या मेगाभरतीच्या अंमलबजावणीवर आक्षेप घेतला होता. त्यासंदर्भात रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पवारांना आश्वस्त केले, यापुढील भरती ऑफलाईन पद्धतीनेच होईल, असेही स्पष्ट केले.

‘महापोर्टल’च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने होत असलेला नोकर भरतीचा वाईट अनुभव लक्षात घेऊन राज्यातील तरुणांचा ऑनलाइन भरतीला अतिशय तीव्र विरोध आहे. अनेक तरुणांनी रोहित पवार व अन्य आमदारांना आणि नेत्यांना भेटून ऑफलाईन भरती करण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करण्याची मागणी केली  होती.”आता या निर्णयामुळे अधिकाधिक तरुणांना नोकर भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. याशिवाय भरती मध्ये एका दिवशी एकाच पदासाठी संपूर्ण राज्यात एकच परीक्षा घेण्यास सरकार प्रयत्नशील आहे” असं पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चेबद्दल रोहित पवारांनी ट्विट करत जाहीर केले