Home महाराष्ट्र सुनावणी दरम्यान श्रीकृष्णाचं नाव घेत न्यायाधीशांवर भिरकावली धातूची बासरी…

सुनावणी दरम्यान श्रीकृष्णाचं नाव घेत न्यायाधीशांवर भिरकावली धातूची बासरी…

0

दिंडोशी कोर्टाच्या खोली क्रमांक १० मध्ये २०१७ मध्ये ओंकारनाथ पांडे यांच्या भावाचा साकीनाका येथे खून झाला या संदर्भात दिंडोशी कोर्टाच्या खोली क्रमांक १० मध्ये खटला चालू होता. लोकमतच्या रिपोर्टनुसार काही वेळात सुनावणी होणार होती. दरम्यान पांडे हे वकिलाच्या वेशात कोर्टात आले. खरंतर या खटल्याचे ते साक्षीदार होते. वेशांतर करून पांडे यांनी कोर्टात ‘जय श्रीकृष्ण’ अशी आरोळी ठोकत न्यायाधिशांवर सोबत आणलेली धातूची बासरी भिरकावली.

अधिक मिळालेल्या माहिती नुसार ही बासरी न्यायाधिशांना लागली नसून कोर्टाच्या स्टेनोग्राफरला लागली आहे. नशिबाने फार कुणाला काही दुखापत झाली नसून उपस्थित पोलिसांनी तात्काळ पांडे यांना सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे अशी माहिती मिळत आहे.