Home आरोग्य मंगूर मासा खाताय, सावधान! तुम्ही देताय कॅन्सरला आमंत्रण

मंगूर मासा खाताय, सावधान! तुम्ही देताय कॅन्सरला आमंत्रण

0

मुंबईतल्या हॉटेलातील सर्वात स्वस्त मासा म्हणजेच CAT फिश म्हणून ओळख असणाऱ्या मंगूर या माशाची उत्पादन केंद्रे बंद करत हजारो मंगूर मासे जमिनीत गाडण्याची मोहीम राज्य सरकारने सुरू केली आहेत.

का करतेय सरकार असे?
मुळचा थाई असलेला हा मंगूर मासा (शास्त्रीय नाव: Clarias gariepinus) सर्व प्रकारच्या सजीव गोष्टींचे भक्षण करतो याला फक्त मगरींचीच भीती आहे. हा मासा देशी प्रजातींचे अस्तित्व संपवून टाकतो. याच्या लागवडीच्या वेळी मांस आणि पालक टाकले जाते ज्यामुळे नदीपात्राचे प्रदूषण सुध्दा होते. हा मासा किलोमागे १०० ते १५० रुपयेपर्यंत मिळत असल्याने याला प्रचंड मागणी असते. 

या माशांची प्रजाती भारतात ९०च्या दशकाच्या सुरुवातीस आली आणि त्या काळच्या सरकारने या माशांच्या उत्पादनाला चालना दिली. कारण अगदी कमी गुंतवणुकीत जास्ती नफा देणारा जोडधंदा म्हणून हा व्यवसाय नावारूपाला आला होता. पण लवकरच या माशाचे दुष्परिणाम समोर येऊ लागले. म्हणूनच इसवी सन २००० मध्ये या प्रजातीच्या माशांची आयात बंद करण्यात आली. तरीसुद्धा या प्रजातीची लागवड भारतात सुरूच होती. राज्य सरकारने या प्रजातीच्या उच्चाटनासाठी घेतलेले पाऊल उशिरा का होईना पण हितकारक असल्याचे म्हणावे लागेल.