Home महाराष्ट्र शरद पवार व अजित पवार यांना ईडीचा दणका : महाराष्ट्र राज्य सहकारी...

शरद पवार व अजित पवार यांना ईडीचा दणका : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल

0

एकीकडे विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी चालू असतांना दुसरीकडे सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ED ने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मीडिया न्यूज नुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकांमधील घोटाळ्याशी संबंधित आरोपाखाली सदर गुन्हा दाखल झाला आहे. शरद पवार व अजित पवार यांच्यासह या आरोपींमध्ये दिलीपराव देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलवडे, आनंदराव अडसूळ व बँकेचे चेयरमान यांचा समावेश आहे.

सक्तवसुली संचालनालयाच्या आरोपांचे स्वरूप पुढील प्रमाणे…
■ २००५ ते २०१० या कार्यकाळात राज्य सहकारी बँकेवर कार्यरत असणाऱ्या संचालक मंडळाने अनेक सहकारी साखर कारखाने, सूतगिरन्या, सहकारी संस्थांना नियमबाह्य कर्जाचे वाटप केले. त्याची रक्कम पंधराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त असावी असे सांगितले जात आहे.

■ कारखान्यांची आर्थिक स्थिती भक्कम नसतांनाही त्यांना कर्ज देण्यात आले; त्याच बरोबर काही प्रकरणात तारणा शिवाय कर्जवाटप झालं.

■ अतिशय मनमाणीने कर्ज वाटप केल्याने बँकेला १० हजार कोटींचं नुकसान झालं.

■ कमकुवत झालेले कारखाने अत्यंत कवडीमोल भावात विकण्यात आले तेही राजकीय नेत्यांच्या अगदी जवळच्या नातेवाईकांना!

असे अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आरोप-प्रत्यारोप झाले. परिणामी शरद पवार व अजित पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा प्रकार समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.