Home महाराष्ट्र “सर्वांनी राजीनामे द्या आणि घरी जा” : अजित पवार संतापले

“सर्वांनी राजीनामे द्या आणि घरी जा” : अजित पवार संतापले

0

अजित पवारांच्या रोखठोक स्वभावाची कल्पना सबंध महाराष्ट्राला आहे. याचीच अनुभूती परत एकदा पाहायला मिळाली. बारामतीच्या शासकीय विश्राम गृहात नगरपालिकेच्या नगर सेवकांची बैठक बोलावण्यात आली होती, या सभेला स्वतः अजित पवार देखील हजर होते. चर्चेत बारामतीच्या विकासावर बोलणी होणार होती. मात्र मूळ विषय राहिला बाजूला आणि नगरसेवक एकमेकांच्या तक्रारी पवारांना सांगू लागले, आरोप प्रत्यारोपाने भांडणाची जागा घेतली. परिणामी अजित पवार संतापले.

संतापून अजित पवार म्हणाले “एक दिलाने, मिळून मिसळून काम करायचं नसेल तर राजीनामे द्या आणि घरी जा. मी प्रशासक आणून बारामतीची विकासकामे करून घेतो” पवारांचा असा चिडलेला सूर ऐकून सभेत शांतता पसरली व काही वेळेने पुढील चर्चेला सुरवात झाली.