Home महाराष्ट्र “फडणवीस तुम्ही केंद्रात जात असाल तर आमच्याकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा”: अजित पवार

“फडणवीस तुम्ही केंद्रात जात असाल तर आमच्याकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा”: अजित पवार

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी अजित पवार यांनी फडणवीसांच्या समोरच तुफान फटकेबाजी केली.

“हे पुस्तक पाहून मला देवेंद्रजी उत्तम लेखक आहेत असं वाटायला लागलंय. एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा जर केंद्रात उपयोग झाला तर बरंच होईल! आणि फडणवीसांनी केंद्रात गेल्यावर सर्वात जास्त खुश होईल तर ते म्हणजे मुनगंटीवार!!” असे म्हणत अजित पवार यांनी फडणवीसांची चांगलीच फिरकी घेतली. त्यानंतर फडणवीसांना केंद्रात पाठवण्यासाठी आम्ही राज्यातल्या सर्व सभागृहात आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमात उद्धव ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस इत्यादी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनीसुद्धा फडणवीसांवर चांगलीच फटकेबाजी केली.