Home महाराष्ट्र फडणवीसांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर केले ५,३८० कोटी…

फडणवीसांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर केले ५,३८० कोटी…

0
devendra fadnavis

सीएमओच्या अधिकृत टिे्वटर अकाउंटवरुन ट्विट करून माहिती देण्यात आली आहे की, ‘मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आपातकालीन निधीतून ५,३८० कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अवकाळी पावसामुळे नुकसानाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न याद्वारे केला आहे.’

मीडिया रिपोर्ट नुसार अजित पवार यांनी काल रात्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत देण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा झाली होती अशी माहिती प्रसार माध्यमांद्वारे मिळत आहे आणि आज CMO महाराष्ट्र ट्विटर या अधिकृत अकाउंट वरून शेतकऱ्याच्या मदतीसाठी केलेल्या तरतुदींची माहिती देण्यात आली.