Home महाराष्ट्र ४० हजार करोड रुपयांसाठी तीन दिवसांचे CM झाले होते फडणवीस: ‘या’खासदारांनी केला...

४० हजार करोड रुपयांसाठी तीन दिवसांचे CM झाले होते फडणवीस: ‘या’खासदारांनी केला खुलासा

0

तीन दिवसांचे मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस अनेक टीका आणि टोमन्यांना सामोरं जात आहेत. मात्र कर्नाटकचे भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी या संदर्भात एक भयंकर मोठा गौप्यस्फोट केला आहे. एक कार्यक्रमात बोलतांना त्यांनी असा खुलासा केला की, ‘महाराष्ट्रात फडणवीस केवळ ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाले होते कारण केंद्राचे ४० हजार कोटी त्यांना वाचवायचे होते. म्हणून त्यांनी बहुमत नाही हे ठाऊक असतांनाही हे पाऊल उचललं.’  त्याचबरोबर हेगडे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या हातात केंद्र सरकारचे ४० हजार कोटी होते. हे जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार आलं आणि त्यांच्या हातात गेले तर या पैशांचा दुरुपयोग होऊ शकतो. म्हणून ही योजना आखून अंमलात आणण्यात आली. फडणवीस सीएम झाल्या नंतर १५ तासांच्या आत केंद्र सरकारचे पैसे परत करण्यात आले.”

हेगडे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त होऊन जळजळीत ट्विट भाजप सरकार विरोधात केलं आहे. ते म्हणाले, “ही तर सरळ सरळ गद्दारी आहे. विकासासाठी आलेला पैसा फडणवीसांनी परत केला असेल तर ही बेईमानी आहे” अशी त्यांनी टीका केली.

फडणवीसांनी मात्र हेगडे यांच्या वक्तव्याचा विरोध केला असून, “मी फक्त राज्याच्या हितासाठी म्हणून मुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला होता” असे म्हणाले. सोबतच “खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका, हेगडे यांच्या वक्तव्यात तथ्य नाही.” असा खुलासा करत त्यांनी राजकीय वर्तुळातील चर्चेला पूर्णविराम देणाचा असफल प्रयत्न केला.