
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भैयाजी जोशी यांच्या मते देवेंद्र फडणवीस यांच्या नावासोबतचा ‘माजी’ हा शब्द आणि विरोधीपक्ष नेतेपद हे अल्पायु आहे. साधना सहकारी बँकेच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते. भैयाजी जोशी हे आरएसएसचे सरसंघचालकानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे बँकेचे अध्यक्ष घनश्याम कुकरेजा तसेच सरिता फडणवीस सुद्धा उपस्थित होत्या. याच कार्यक्रमात स्व. मा. आ. गंगाधरराव फडणवीस यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे सुद्धा अनावरण केले गेले. मीडिया न्यूजनुसार भैयाजी जोशी यांचे वक्तव्य व त्यांनंतर उद्धव ठाकरे- नरेंद्र मोदी यांची भेट या घडामोडी काही वेगळे संकेत तर देत नाहीत ना असा सवाल उपस्थित होतो.
यानंतर भैयाजी जोशी यांनी भडखाऊ भाषण करणारा वारीस पठाण वर सुद्धा तिखट शब्दात भाष्य केले. “हिंदुस्थान सहिष्णू देश आहे, मुस्लिम देशात असे कोणी बोललं असते तर खपवून घेतलं असते काय?” असे ते म्हणाले. बँकेसंदर्भात बोलतांना त्यांनी सहकारितेचा भाव सक्षम राहायला हवा अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी शहरातील बहुतेक मान्यवर मंडळी उपस्थित होती तसेच प्रेक्षकांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली.
Video पहा