Home महाराष्ट्र भीक कमी आणली म्हणून वडिलांनी मुलाला बेदम मारले…

भीक कमी आणली म्हणून वडिलांनी मुलाला बेदम मारले…

0

मंगळवारी पालघर शहरातील बिकानेर येथे एक मुलगा रस्त्याच्या कडेला विव्हळत, रडत बसला होता. परिसरातील नागरिकांनी त्याची चौकशी केली असता धक्कादायक कारण समोर आलं. “बाबाला पैसं नाय दिलं, तय त्याहानं मना कुटला” असं त्या चिमुकल्याने उत्तर दिलं व ऐकणाऱ्यांच्या काळजाचं पाणी झालं. या मुलाचं नाव ‘सुर्या’ असं असून केवळ भीक कमी आणली म्हणून त्याला त्याच्या वडिलांनी बेदम मारलं!

सूर्याचं संपूर्ण कुटुंब भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी सूर्याच्या वडिलांनी हद्दच पार केली. रोजच्यापेक्षा कमी भीक आणल्याने संतापलेल्या पित्याने सुर्याला बेदम मारले. इतके मारले की सुर्याच्या डाव्या हाताचे हाड मोडले. मिळालेल्या माहिती नुसार त्याच्या वडिलांनी काठीने सूर्याच्या डाव्या हातावर वार केला. परिणामी त्याचा हात मोडला. सूर्याला परिसरातील नागरिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून तिथेच त्याच्यावर उपचार चालू आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता सुर्याचे वडील अर्थात संजय सूर्याला दररोज भीक मागायला लावतात व त्याने भीक मागून आणलेल्या पैशांवर मौजमजा करतात अशी माहिती त्याच्या शेजाऱ्यांनी दिली असल्याचं काही मीडिया रिपोर्टनुसार समोर आलं आहे.