Home महाराष्ट्र वडील सेनेत तर मुलगा राष्ट्रवादीत: बाप लेकाचं राजकारण

वडील सेनेत तर मुलगा राष्ट्रवादीत: बाप लेकाचं राजकारण

0

अहमदनगर येथील अंबादास पंधाडे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार अशी माहिती मिळत आहे. नुकतीच अनिल राठोड यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर पंधाडे त्यांच्या भेटीसाठी गेले.
याउलट पंधाडे यांचा मुलगा सारंग मात्र राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा खास कार्यकर्ता आहे. नगरच्या राजकारणात या निमित्ताने ‘वडील इकडं आणि मुलगा तिकडं’ असं चित्र पाहायला मिळतं आहे. अगदी लहानपणापासूनच रक्तात भिनलेलं हिंदुत्व घेऊन अंबादास पंधाडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत तर त्यांचा मुलगा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत राष्ट्रवादीत.

मागील पाच वर्षात नगरसेवक पदापुरतीच धाव असलेले पंधाडे राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. मात्र आता पुढे काय होणार याकडे अहमदनगरकरांचे लक्ष लागले आहे.