Home महाराष्ट्र अखेर नितीन गडकरी सत्तास्थापनेवर बोलले : मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा.

अखेर नितीन गडकरी सत्तास्थापनेवर बोलले : मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा.

0

सत्तास्थापनेच्या हमरी तुमरीत नितीन गडकरी अद्याप मौन धरून होते. मात्र अखेर त्यांनी मौन सोडले आहे. “भाजपा शिवसेना युतीला महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे सरकार महायुतीचंच येणार हे उघड आहे. शिवसेनेशी चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्षांमधला तिढा लवकरात लवकर सुटेल.” सोबतच १०५ जागा जिंकल्यामुळे मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

यावेळी गडकरी मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा रंगली. दरम्यान याबद्दल प्रश्न विचारला असता गडकरी म्हणाले, “मी केंद्रात काम करतो आहे. मुख्यमंत्री पदासाठी मी उत्सुक नाही” असं त्यांनी स्पष्ट केलं. एकंदर मौन धरून बसलेले चेहरे बोलू लागले आहेत. यावरून राजकीय वर्तुळात चालू असणाऱ्या वेगवान हालचालींचा अंदाज येतो. अर्थात लवकर सत्तास्थापणेचा काय तो एकदाचा सोक्षमोक्ष होण्याची चिन्ह आहेत.