Home महाराष्ट्र मुंबईतील जीएसटी भवनाच्या आठव्या मजल्याला आगीने घेरले; पहा व्हिडीओ

मुंबईतील जीएसटी भवनाच्या आठव्या मजल्याला आगीने घेरले; पहा व्हिडीओ

0

नुकत्याच आलेल्या लोकमतच्या मीडिया न्यूजनुसार मुंबईतील माझगाव येथील जीएसटी भवनाच्या आठव्या मजल्याला भीषण आग लागली आहे. आज अर्थात सोमवारी दुपारी १२.३० वाजेच्या आसपास ही आग लागल्याचे आणि पसरत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यामुळे घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवळपास २० गाड्या पोहचल्या असून दलाचे जवान आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 

मिळालेल्या अधिक माहितीनुसार घटनास्थळी अर्थात जीएसटी भवनात भरपूर कागदपत्रे, लाकडी सामान, फर्निचर आहे. त्यामुळे आग वाढत असून सर्व कागदपत्रे जळून गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या आगीचे कारण अजून समजू शकलेले नाही. ही आग लेव्हल 3 अर्थात गंभीर स्वरूपाची आग असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.