Home आरोग्य कोरोनामुळे बुलडाण्यात पहिला मृत्यू; दफनविधीला तुफान गर्दी!

कोरोनामुळे बुलडाण्यात पहिला मृत्यू; दफनविधीला तुफान गर्दी!

0

आत्तापर्यंत एकही पॉसिटीव्ह रुग्ण नसलेला बुलढाणा जिल्हा काल अचानक हादरला. शासकीय रुग्णालयात भरती केल्याच्या तासाभरातच एका रुग्णाचा मृत्यू झाला धक्कादायक बाब म्हणजे त्याचा दफनविधी होईपर्यंत त्याच्या कोरोना टेस्ट चे परिणाम येण्याचे बाकी होते. मृत व्यक्ती कोरोना पॉसिटीव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

सदर रुग्ण हा गेले ५ दिवस एका खासगी दवाखाण्यात भरती होता. न्यूमोनियाची लक्षणे असल्याने त्यांना भरती ठेवण्यात आले होते. हे गृहस्थ बुलडाणा शहरातील एका शाळेचे प्राचार्य असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी पुष्कळ नगर सेवक व अनेक कार्यकर्ते दवाखान्यात त्यांच्या संपर्कात आले. दरम्यान त्रास जास्ती झाल्याने त्यांना सरकारी रुग्णालयात कोरोना कक्षात दाखल करताच त्यांचा तासाभरातच मृत्यू झाला. त्या वेळी रक्ताचे नमुने नागपूर ला पाठवले होते. दफनविधी ला सुद्धा असंख्य नागरिकांनी हजेरी लावली. पण ज्यावेळी टेस्ट कोरोना पॉसिटीव्ह आली तेव्हा सगळ्यांचेच धाबे दणाणले. कारण तोपर्यंत असंख्य लोकांच्या संपर्कात मृत व्यक्ती आला होता.

प्रशासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेत बुलडाणा शहराच्या सर्व सीमा बंद केल्या असून पूर्णपणे संचारबंदी लावण्यात आली आहे. ते ज्या खासगी रुग्णायलात होते तेथे असलेल्या प्रत्येक रुग्णाची चौकशी केली जात आहे तसेच त्यांच्या दफनविधीला जिल्हाभरातून हजर असलेल्या लोकांना सुद्धा पोलीस ताब्यात घेत असून त्यातले अनेक लोक फरार आहेत. ह्या एका व्यक्तीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात कोरोना हाहाकार माजवू शकतो त्यामुळे प्रशासन अनेक स्तरांवर खबरदारी घेत आहे.

बुलडाणा जिल्ह्याचा कलेक्टर सुमन चंद्रा यांनी केलेले ट्विट