
२०० ते ३०० सशस्त्र नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलीस कमांडोंनी केलेल्या हल्लाला परतवून लावले. नक्षलग्रस्त गडचिरोलीतील भामरागड नजीकच्या भागात अबूजमाड जंगलात लपून बसलेले हे नक्षलवादी अत्याधुनिक शस्त्रांसह सज्ज होते. दरम्यान पोलीस कमांडो आणि नक्षवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी एका नक्षलवाद्याला गोळीने अचूक निशाणा साधून जमीनदोस्त केले.
सामनाच्या एका रिपोर्टनुसार पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या ज्या मयत साथीदाराला पोलिसांनी गोळी घातली होती त्याचा मृतदेह घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. मिळालेल्या अधिक माहितीनुसार भामरागड परिसरातील लाहेरी हद्दीपासून ४० किलोमीटरवर नक्षल्यांचा गड असलेल्या अबुजमाड जंगल परिसरात नक्षल्यांकडून हल्ल्याची योजना आखण्यासाठी तळ उभारण्यात आला होता. नक्षलवाद्यांचा म्होरक्या सोनू ऊर्फ भूपती याने हा तळ उभारला असं सांगितलं जात आहे. या तळावर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या नेतृत्वाने गडचिरोली पोलीस दलातील सी-60 कमांडो पथकाने बेधडक कारवाई केली व २०० ते ३०० नक्षलवाद्यांना पिटाळून लावले