अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे मध्ये महिला कला महाविद्यालयातील मुलींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्याचा किस्सा चांगलाच गाजला. यानंतर तिथल्या शिक्षकांवर निलंबनाची नामुष्कीसुद्धा ओढवली पण आता या बातमीने वेगळेच वळण घेतले आहे.
“मी प्रेमविवाह करणार नाही” अशी शपथ घेणारी याच महाविद्यालयातील तरुणी चक्क प्रियकरासोबत पसार झाली. तिच्या आईने युवकाने फूस लावून आपल्या मुलीला पळवल्याची तक्रार नोंदवली. या विद्यालयातील विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्याचे प्रकरण चांगलेच गाजले. मुलींपेक्षा मुलांनाच शपथ द्यायला पाहिजे असा रोष सगळीकडे होत असतांंना आता या नव्या ट्विस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.