Home महाराष्ट्र पुणे पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या: भुजबळांचा मुख्यमंत्र्यांवर सणसणीत टोला

पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या: भुजबळांचा मुख्यमंत्र्यांवर सणसणीत टोला

0

धवारी पावसामुळे १९ निष्पाप नागरिकांचे बळी गेले. निवडणूका तोंडावर असतांना पुण्यातील या परिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. “तिकीटवाटपाला उशीर झाला तरी चालेल. आधी पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या”, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटलांवर केला आहे.

बुधवारी रात्री पुण्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली, वाहतूक विस्कटली व आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला असून, ९ जण अजूनही बेपत्ता आहेत. असे असूनही पुण्यातील पूरपरिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तिकीटवाटपाला दोन दिवस उशीर झाला तरी चालेल, पण आधी पुण्यातील पूरस्थितीकडे सरकारने लक्ष द्यायला हवं; मदतकार्याला उशीर झालेला चालणार नाही, असं भुजबळ म्हणाले.