Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील युवकांना सुवर्णसंधी, उद्योगधंदे कामगाराविना ओसाड!

महाराष्ट्रातील युवकांना सुवर्णसंधी, उद्योगधंदे कामगाराविना ओसाड!

0

महाराष्ट्रात आणि देशात चौथा लॉकडाऊन सुरू होई पर्यंत लाखो परराज्यातील कामगार राज्य सोडून त्यांच्या गावी परतले. हे मजूर आणि कामगार विविध उद्योगधंद्यांमध्ये काम करत होते आता मात्र ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील उद्योग सुरू करण्याच्या पवित्र्यात असताना मजूर मिळेनासे झाले आहेत.

लॉकडाऊन ४ मध्ये सरकारने ऑरेंज आणि ग्रीन झोन मधले उद्योगधंद्यांना अटींमध्ये शिथिलता आणली. आता सोशल डिस्टन्सचे पालन करत आता त्यांना त्यांचे उद्योग सूरु करता येणार आहेत. असे असताना मात्र उद्योगधंदे एका वेगळ्या संकटात सापडले आहेत. त्यांना त्यांचे उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक तेवढे कामगार मिळू न शकल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.

परराज्यातील मजूर त्यांच्या गावी परत गेल्याने मात्र आपल्या राज्यातील कामगार आणि युवकांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आपल्याला उद्योग सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे कोरोना सारख्या काळात चालून आलेल्या या संधीचा पुरेपूर फायदा आपण घ्यायला हवा.