Home महाराष्ट्र चांगली बातमी! ब्युटी पार्लर आणि सलून सुरू होणार, पण आधार कार्ड बंधनकारक?

चांगली बातमी! ब्युटी पार्लर आणि सलून सुरू होणार, पण आधार कार्ड बंधनकारक?

0

LockDown मुळे सलून आणि ब्युटी पार्लर बंद असल्याने नाभिक समाजाला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, लवकरच केशकर्तनालय व पार्लर सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती राज्याचे ओबीसी कल्याण, भूकंप, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज(दि.२३) गडचिरोलीमध्ये पत्रकार परिषदेत दिली.

वडेट्टीवार म्हणाले की, “व्यवसाय बुडाल्याने राज्यभरातील नाभिक समाजाला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्व केशकर्तनालय व पार्लर सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे. यासंदर्भात येत्या आठवडाभरात सरकार निर्णय घेणार आहे. परंतु सलून सुरु झाल्यानंतर सामाजिक अंतर व अन्य अटींचे पालन करावेच लागेल”

दक्षिणेकडील राज्यांनी या अगोदरच यांना परवानगी दिली असून त्यांनी सुरक्षित अंतर आणि नियम याबाबत आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र सरकार सुद्धा याच धर्तीवर नियमावली लवकरच जाहीर करेल पण दक्षिणी राज्यांसारखे कटिंग दाढी साठी आधार कार्ड आवश्यक करणार आहेत का नाही हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.