Home महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता सावकारी कर्ज सुद्धा माफ करणार सरकार

विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता सावकारी कर्ज सुद्धा माफ करणार सरकार

0

पणन आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाने या कर्जमाफीचा शासन निर्णय जाहीर केला आहे. यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवाना असलेल्या सावकारांकडून कर्ज घेतले असेल तर शासनामार्फत संबंधीत सावकारास ती रक्कम परत देण्यात येईल.

सावकाराने सरकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेलं कर्ज या योजनेस अपात्र ठरवण्यात आलं होतं. पण आता हे कर्ज पात्र करण्यात आलं असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सण २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ₹६५.०० कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे.