Home महाराष्ट्र शेतकरी बांधवांसाठी खुशखबर! फळपीक विमा योजना राबवण्याचा सरकारचा निर्णय.

शेतकरी बांधवांसाठी खुशखबर! फळपीक विमा योजना राबवण्याचा सरकारचा निर्णय.

0
fruitcrop insurance sceme

प्राईम नेटवर्क : पंतप्रधान फळपीक विमा योजने अंतर्गत राज्यात निवडक फळपिकांसाठी हवामानावर आधारित विमा योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत शासनाने निर्देशित केलेल्या हवामान केंद्रात नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तापशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

     पिकांवर कमी तापमानाचे निश्चित केलेले ट्रिगर आणि नुकसान भरपाई रक्कम पुढीलप्रमाणे
●संत्रा
सर्वच जिल्ह्यांसाठी
पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी – 16 जानेवारी 2019 ते फेब्रुवारी 2019
हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमन डिग्री सेल्सियसमध्ये) – सलग तीन दिवस 12 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास
विमा संरक्षित रक्कम रु. प्रती हेक्टर – 19,250 रुपये
●डाळिंब
सर्व जिल्ह्यांसाठी
पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी – 1 डिसेंबर 2018 ते 31 जानेवारी 2019
हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमन डिग्री सेल्सियसमध्ये) – सलग दोन दिवस 10 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास
विमा संरक्षित रक्कम रु. प्रती हेक्टर – 18150 रुपये
●केळी
सर्व जिल्ह्यांसाठी
पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी – 1 नोव्हेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019
हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमन डिग्री सेल्सियसमध्ये) – सलग तीन दिवस 8 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास
विमा संरक्षित रक्कम रु. प्रती हेक्टर – 33,000 रुपये
●काजू
सर्व जिल्ह्यांसाठी
पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी – 1 डिसेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019
हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमन डिग्री सेल्सियसमध्ये) – सलग तीन दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास- प्रती हेक्टर – 11,150 रुपये
सलग चार दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास – प्रती हेक्टर 17,150 रुपये
सलग पाच दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास – प्रती हेक्टर 28,600 रुपये
●आंबा
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी
पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी – 1 डिसेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019
हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमन डिग्री सेल्सियसमध्ये) – सलग तीन दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास – प्रती हेक्टर 4300 रुपये
सलग चार दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास – प्रती हेक्टर – 8580 रुपये
सलग पाच दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास- प्रती हेक्टर – 12200 रुपये
सलग सहा दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास – प्रती हेक्टर- 16,500
सलग सात दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास – प्रती हेक्टर – 24,200
अहमदनगर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, परभणी, नांदेड, वाशिम, जालना, धुळे, बुलढाणा, जळगाव, नाशिक, पुणे, सांगली, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी.
पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी – 1 जानेवारी 2019 ते 28 फेब्रुवारी 2019
हवामान धोका ट्रिगर (दैनंदिन तापमन डिग्री सेल्सियसमध्ये) – सलग तीन दिवस 13 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास- प्रती हेक्टर – 36,300 रुपये
●द्राक्ष
नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, बुलढाणा या जिल्ह्यांसाठी.
पिकाचा कमी तापमान हवामान धोक्यापासून निश्चित केलेला संरक्षण कालावधी – 1 डिसेंबर 2018 ते 28 फेब्रुवारी 2019
दैनंदिन तापमान 3.51 डिग्री सेल्सियस ते 4.00 सेल्सियस दरम्यान नोंदले गेल्यास प्रती हेक्टर – 9,900 रुपये
3.01 ते 3.50 डिग्री सेल्सियस असल्यास- प्रती हेक्टर 14850 रुपये
2.51 ते 3.00 डिग्री सेल्सियस असल्यास- प्रती हेक्टर- 19800 रुपये
2.01 ते 2.50 ड्रिग्री सेल्सियस असल्यास प्रती हेक्टर 29,700 रुपये
2 डिग्री सेल्सियस पेक्षी कमी नोंदलो गेल्यास- प्रती हेक्टर- 49,500 रुपये