
आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बदलापूर परिसरात असणाऱ्या एमआयडीसीतील एका कंपनीत जोरदार स्फोट झाला असून स्फोटात एक कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती केलात आहे. स्फोट झाल्याने कंपनीत आग देखील लागली होती मात्र तत्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं.
लोकमतच्या ऐपोर्ट नुसार बदलापूर परिसरातील एमआयडीसीत के जे रेमेडिज नावाच्या कंपनीध्ये हा स्फोट झाला सध्यातरी या स्फोटाच कारण कंपनीतील ड्रायरचा स्फोट झाला व त्यामुळे कंपनीत ठिकठिकाणी आग लागली असं सांगितलं जातं आहे. स्फोटातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.