Home महाराष्ट्र पुढील चार दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

पुढील चार दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

0

महाराष्ट्रात पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यातील कोकण,विदर्भ, मराठवाडा, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

यासोबतच मुंबई आणि पुणेतही पावसाची शक्यता आहे. गोव्यात काही ठिकाणी अति जास्त पावसाचा इशारा आहे. तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली आहे.