सध्या टिकटॉकवर ‘आला पाऊस गेला पाऊस-आला वारा गेला वारा’ याचा ट्रेंड चालू आहे. तुम्हीही सोशल मीडियावर याचा एखादा व्हिडीओ पाहिलाच असेल. मात्र आता तरुण मंडळीच नाहीतर राजकिय नेते देखील एकमेकांवर तोफ डागण्यासाठी या ट्रेंडला हत्यार करीत आहेत. मागे काही दिवसांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हे सरकार तीनचाकी रिक्षासारखं आहे त्यामुळे याला गती मिळणार नाही.’ हे सरकार फारकाळ टिळणार नाही असं देखील ते म्हणाले होते. या वक्तव्यानंतर फडणवीसांना अनेक टिकांचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा एकदा काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी फडणवीस यांच्यावर टिक-टॉक स्टाईलनं निशाणा साधला आहे.
काय म्हणाले काँग्रेस नेते सचिन सावंत तुम्ही स्वतःचा पहा व्हिडीओ खालील प्रमाणे…
https://twitter.com/sachin_inc/status/1212659913081708544?s=19
.
हा व्हिडीओ भरपूर व्हायरल होत असून लोक यावर भरभरून चर्चा करीत आहेत. ही चर्चा केवळ नेटकऱ्यांपर्यंत सीमित नसून राजकीय वर्तुळातही चर्चा होत आहे