Home महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या पक्षाचे किती मंत्री? : काही खाती रिक्त!

मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या पक्षाचे किती मंत्री? : काही खाती रिक्त!

0

राज्यात महाविकासआघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि शपथविधी हा मुहूर्त सुनिश्चिंत झाला असून आज दुपारी १ वाजता शपथविधी होणार आहे. राज्यपाल राजभवनात सर्व मंत्र्यांना शपथ देतील. हाती आलेल्या माहितीनुसार सर्व महाविकासआघाडीच्या मंत्र्यांच्या यादी तयार असून कोणत्या पक्षाचे किती मंत्री राहणार आहेत ते खालील प्रमाणे.

मीडिया रिपोर्ट नुसार मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे एकूण १३ मंत्री शपथ घेणार आहेत, ज्यात १० कॅबिनेट आणि तीन राज्य मंत्र्यांचा समावेश असेल. अशी माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील एकूण १३ मंत्री आज शपथ घेणार असून त्यात १० कॅबिनेट व 3 राज्यमंत्री शपथ घेतील. अशी माहिती मिळत आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसचे १२ मंत्री आज शपथ घेणार असून त्यात १० कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री आहेत. व सरते शेवटी मंत्रिमंडळ विस्तारात काही खाती रिक्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहितीही ‘सकाळ’ च्या एक रिपोर्ट नुसार मिळत आहे.