Home महाराष्ट्र सत्तेसाठी शिवसेना किती लाचारी पत्करणार? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

सत्तेसाठी शिवसेना किती लाचारी पत्करणार? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

0

एकीकडे छिंदवाडा येथे छत्रपती शिवाजी मराहाजांचा पुतळा हटवण्यासाठी JCB चा वापर करण्यात आला. दुसरीकडे काँग्रेसने शिदोरी या मुखपत्रात वीर सावरकर यांचा अपमान केला. मात्र यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नसल्याची माहिती मिळत आहे परिणामी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी “सत्तेसाठी शिवसेना किती काळ लाचार राहणार?” असा सवाल केला आहे.

लोकसत्ताच्या रिपोर्ट नुसार “छिंदवाडा येथे पुन्हा सन्मानपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा आशी देखील मागणी फडणवीस यांनी केली.” त्याचबरोबर फड़नवीस म्हणाले ” हे सगळं शिवसेनेला चालतं असेल मात्र वीर सावरकर यांचा अपमान भाजपा सहन करणार नाही.” छत्रपती शिवाजी महाराज व वीर सावरकर यांचा अपमान केल्या प्रकरणी काँग्रेसने जाहिर माफी मागावी अशीही मागणी फडणवीस यांनी केली आहे.