Home महाराष्ट्र मी अजून हि राष्ट्रवादी मध्येच आणि साहेबच माझे नेते, फक्त थोडा धीर...

मी अजून हि राष्ट्रवादी मध्येच आणि साहेबच माझे नेते, फक्त थोडा धीर धरा : अजित पवार

0

प्राईम नेटवर्क : मी अजून हि राष्ट्रवादी मध्येच आहे, आणि आमचे साहेब म्हणजे शरद पवार हेच माझे नेते असून मी अजून हि फक्त राष्ट्रवादीचाच आहे, राष्ट्रवादी आणि भाजप या दोघांची हि युती असून हि युती महाराष्ट्राला पुढील पाच वर्षांसाठी चांगलं सरकार देईल, महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या भल्या साठी आम्ही नेहमी प्रयत्न करत राहू, असं बंडखोरी करून भाजप मध्ये गेलेले अजित पवार यांनी ट्विट द्वारे म्हटलंय, मागील २४ तास उलटून गेल्यावर सोशल मीडियावर अजित पवार आता ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळालं.

यापुढे पुढील ट्विट मध्ये अजित पवार म्हणतात, खरंच काही काळजी करायचं कारण नाही, फक्त थोडा धीर धरण्याची गरज आहे, तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यासाठी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार, या नंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर अनेक आजी माजी मंत्री नेते यांनी त्यांनी ट्विट करून शुभेच्छा दिल्या होत्या, या शुभेच्छांचा स्वीकार करत त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

दरम्यान काल (शनिवारी) राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना घडली. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज राजभवनात हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.

अजित पवारांच्या बंडखोरीमुळे पवार कुटुंबियांच्या उभी फूट पडल्याचं दिसत आहे. अजित पवारांच्या या अचानक वागण्यामुळे पवार कुटुंबीय उद्विग्न झाल्याचं पाहायला मिळालं, रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक प्रोफिलचा दोनदा फोटो बदलला, त्यांनी आजोबा शरद पवार यांच्या सोबत असलेला फोटो फेसबुक वर टाकत आपण शरद पवार यांच्या बरोबरच असल्याचा दाखवून दिल, तर सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हाट्सअपचं स्टेटस अनेक वेळा बदललं, त्यांनी आपल्या व्हाट्सअप वर कालपासून अनेक स्टेट्स बदलल्याचं पाहायला मिळाल..

हे सुद्धा वाचा :

आमच्यासाठी अजित पवार आता कुटुंबाचा हिस्सा नाही, सुप्रिया सुळेंच व्हाट्सअप स्टेटस

हे चित्र आयुष्यभर लढण्याची जिद्द देईल, सुप्रिया सुळेंच अजित पवारांसाठी भावनिक स्टेट्स