Home महाराष्ट्र “सगळंच माफ करायला लागलो तर मला कपडे काढून द्यावे लागतील”- अजित पवार

“सगळंच माफ करायला लागलो तर मला कपडे काढून द्यावे लागतील”- अजित पवार

0

जुन्नर येथील एका कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर वीजबिल माफीबद्दल एका कार्यकर्त्याने विचारले असता, “सगळंच माफ केलं तर मला कपडे काढून घ्यावे लागतील”, असा शाब्दिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लावला. शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमामधे ते बोलत होते. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात रायगड आणि शिवनेरीच्या विकास कामासंदर्भातील विविध घोषणा सुद्धा करण्यात आल्या.
“मराठा आंदोलकांवरील गुन्हे आम्ही मागे घेणार आहोत” असे वक्तव्य सुद्धा अजित पवार यांनी या वेळी केले. मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्यांबाबत ते बोलत होते.