
राष्ट्रपती राजावट लागूनही अद्याप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला सोडलेला नाही. कार्यकाळ संपल्यानंतर सरकारी निवास सोडावा लागतो. मात्र फडणवीसांना आणखी तीन महिने वर्षा बंगल्यात राहता येणार आहे. त्यांनी वास्तव्याच्या मुदत वाढीसाठी अर्ज केला होता आणि तो मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती मिळत आहे.
इतर मंत्र्यांनी सरकारी निवास सोडले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुदतवाढीसाठी अर्ज केला होता. मीडिया न्यूज नुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने सर्व मंत्र्यांना १३ नोव्हेंबरपर्यंत मंत्रालयातील कार्यालये रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मंत्र्यांनी एका दिवसाच्या आतच मंत्रालयातील आपापली कार्यालये रिकामी केली. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बंगल्यात आणखी तीन महिने राहता येणार आहे. त्यांना वाढीव मुदत देण्यात आली आहे. या दरम्यान सध्या शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी सत्ता स्थापनेच्या दिशेने चांगलीच वाटचाल केली आहे. जर यदाकदाचित तीन महिन्यांच्या आत सत्ता स्थापन झाली तर फडणवीसांना तातडीने वर्षा बंगला रिकामा करावा लागेल.