Home महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवडा पाच दिवसांचा असेल तर, सात दिवसांचा पगार का द्यायचा?...

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवडा पाच दिवसांचा असेल तर, सात दिवसांचा पगार का द्यायचा? राज्यमंत्री बच्चू कडूंचा सवाल

0

गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय कर्मचारी पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी करत होते. अखेर काळ अर्थात १२ फेब्रुवारी रोजी ठाकरे सरकारनं शासकीय कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर शिक्कामोर्तब करत मान्यता दिली आहे व येत्या २९ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र ठाकरे सरकारच्या या निर्णयावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. “सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवडा पाच दिवसांचा असेल तर, सात दिवसांचा पगार का द्यायचा?” असा प्रश्न देखील त्यांनी मांडला आहे. ते म्हणाले, “पाच नाही तर चार दिवसांचा देखील आठवडा केला तरी हरकत नाही. मात्र, कामाचं मूल्यमापन करून मगच पगार दिला पाहिजे” असं देखील बच्चू कडू यांनी मत व्यक्त केलं आहे.

‘ABP माझा’च्या रिपोर्ट नुसार “काही कर्मचाऱ्यांच्या टेबलावरुन फायली महिनो न महिने पुढे सरकत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांना लाभ का द्यायचा. सहा दिवसांचा आठवडा असूनही सामान्य जनतेची कामे होत नाहीत मग पाच दिवसांत ही कामे होतील का?” असा सवाल करत शासनाच्या या निणर्यावर त्यांनी टीका केली. २९ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून शासकीय कर्मचारी पाच दिवस काम करतील. मात्र या पाच दिवसांत कामाच्या वेळेत वाढ करण्यात येणार आहे जी कार्यालये सकाळी १० ला कामाची सुरुवात करायचे त्यांना आता सकाळी ९ ला कामाची सुरुवात करावी लागेल जे सायंकाळी ६-७ वाजेपर्यंत चालेल अशी माहिती मिळत आहे.