Home महाराष्ट्र सत्ता स्थापन करायची असेल तर आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करा; राज्यपालांची अट

सत्ता स्थापन करायची असेल तर आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करा; राज्यपालांची अट

0

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जर सत्ता स्थापन करायची असेल तर राज्यपालांच्या काही अटींना सामोरे जावे लागणार आहे. राज्यपाल म्हणाले, “महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्यास पाठिंबा आहे हे सूचित करणारे आमदारांचे निळ्या शाईतील सहीचे स्वतंत्र पत्र सादर करावे, तसेच आमदारांच्या सह्या जबदस्तीने किंवा अन्य माध्यमांतून घेण्यात आलेल्या नाहीत, असे प्रमाणित करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांची प्रतिस्वाक्षरी या पत्रांवर असावी,” अशी त्यांनी अटच घातली आहे.

लोकमतच्या रिपोर्ट नुसार, राज्यपालांच्या या अटीने पर्यायी सरकार स्थापन करण्याच्या संयुक्त विरोधी पक्षांच्या प्रयत्नांना विलंब होत आहे. या अटीनुसार आमदारांची वैयक्तिक स्वाक्षरी मिळविण्यासाठी नेते धावपळ करीत आहेत. मात्र पाठिंब्याच्या पत्रावर स्वाक्षरी करण्याआधी काही आमदारांनी आपल्या मागण्या पक्षनेतृत्वापुढे रेटल्या असल्याची माहिती मिळत आहे.

या राज्यपालांच्या अटींमुळे आमदार आपली पोळी भाजून घेणार तर आमदारांच्या मागण्या मान्य करत पत्रावर सही घेण्यासाठी पक्ष प्रमुखांच्या नाकी नऊ येत आहेत.