
‘राजकारणात आणि क्रिकेट मध्ये कधी काय होईल सांगता येत नाही’ या नितिन गडकरी यांच्या वक्तव्याला शरद पवार यांनी मिश्किल सणसणीत उत्तर दिलं आहे. “मी क्रिकेट सामन्यांचा आयोजक आहे, मी सामने खेळवतो, मी खेळाडू नाही, क्रिकेट खेळत नाही, क्रिकेट खेळवतो” अशा निराळ्या शैलीत शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.
नितीन गडकरींसह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पवारांनी चांगलाच टोला दिला आहे. “देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात नेहमीच मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हेच सुरू असतं, आणि पुन्हा भाजपचंच सरकार येईल असं ते म्हणत असतील, तर ते ज्योतिषशास्त्र देखील पाहतात, म्हणजे भाकीत करतात हे मला ठाऊक नव्हतं” असं ते म्हणाले.