Home महाराष्ट्र अवघ्या दोनच दिवसांत साडेसात लाखांहून अधिक लोकांनी केला एसटीने प्रवास!

अवघ्या दोनच दिवसांत साडेसात लाखांहून अधिक लोकांनी केला एसटीने प्रवास!

0

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले पाच महिने एसटी बंद होत्या त्यामुळे एसटी चालक जणू काही संकटात कोसळले होते. परंतु गुरुवार पासून एसटी चालू झाल्या आहेत. तसेच गुरुवार आणि शुक्रवारी अनेक लोकांनी एसटी ने प्रवास केला.

गेल्या दोनच दिवसांत साडेसात लाखाहून अधिक लोकांनी एसटी ने प्रवास केल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून मिळाली आहे. बऱ्याच दिवसांनी एसटी चालू झाल्यानंतर गुरुवारी राज्यांतर्गत २४९३ बसद्वारे ११६६६ फेऱ्यांद्वारे २ लाख ५८ हजार ४०७ प्रवाशांनी एसटी ने प्रवास केला. तसेच शुक्रवारी ५ लाखांहून अधिक लोकांनी प्रवास केला. आता एसटी ने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे.

गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी लोक बाहेर पडत असून संख्या वाढत आहे. काँग्रेस चे सरचिटणीस तसेच महाराष्ट्र एसटी कर्मचारी म्हणाले की गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या दुप्पट झाली आहे.