Home महाराष्ट्र मागील वर्षभरात १५० नागरिकांचा नक्षलवादी हल्ल्यात व हिंसाचारात मृत्यू

मागील वर्षभरात १५० नागरिकांचा नक्षलवादी हल्ल्यात व हिंसाचारात मृत्यू

0

गेल्या तीन वर्षांपासून देशातील विविध राज्यांतील विशेषत: नक्षलग्रस्त भागांतील हिंसाचारात घट झाल्याची माहिती काल संसदेत देण्यात आली आहे. ‘सकाळ’च्या एका रिपोर्टनुसार गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी स्वतः लोकसभेत लेखी प्रश्‍नोत्तराच्या तासात नक्षल हिंसाचार कमी झाल्याची माहिती दिली अशी माहिती मिळत आहे.

मागील ३ वर्षातील देशातील नक्षल हिंसाचार
२०१७ मध्ये ९०८ वेळा हिंसाचार
२०१८ मध्ये ८३३ वेळा हिंसाचार
२०१९ मध्ये ६७० वेळा हिंसाचार

वरील आकडेवारीवरून लक्षात येते की, मागील ३ वर्षात नक्षल हिंसाचारात घट होत आहे. याउलट नक्षलवादी हल्ल्यात आणि हिंसाचारात मृत्यू झालेल्या नागरिकांचा आकडा देखील समोर आला आहे.

मागील ३ वर्षांत नक्षलवादी हल्ल्यात व हिंसाचारात मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या
२०१७ मध्ये १८८ मृत्यू
२०१८ मध्ये १७३ मृत्यू
२०१९ मध्ये १५० मृत्यू
वरील आकडेवारी पाहता दर वर्षी नक्षलवादी हल्ल्यात व हिंसाचारात मृत्यूत घट होत असल्याचे सांगितले जात आहे.

नक्षलवादी हल्ल्यात व हिंसाचारात शहीद झालेले जवान
२०१७ मध्ये ७५ जवान शहीद झाले
२०१८ मध्ये ६७ जवान शहीद झाले
२०१९ मध्ये ५२ जवान शहीद झाले

मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांचा दर
२०१७ मध्ये १३६ नक्षलवादी मारले गेले.
२०१८ मध्ये २२५ नक्षलवादी मारले गेले.
२०१९ मध्ये १४५ नक्षलवादी मारले गेले.