Home तंत्रज्ञान “वेदपुराणांमध्ये ब्रह्मस्त्राचा उल्लेख आहे तर मग रामराज्यात लोक वीज वापरत होते का?”,...

“वेदपुराणांमध्ये ब्रह्मस्त्राचा उल्लेख आहे तर मग रामराज्यात लोक वीज वापरत होते का?”, जयंत नारळीकर

0

प्रसिद्ध वैज्ञानिक जयंत नारळीकर यांचा आज जन्मदिवस त्यांच्या जन्मदिवशी BBC ने घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अत्यंत सोप्या आणि तर्कशुद्धपणे त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

मुलाखतकाराने जेव्हा त्यांना विचारले, ” आजकालची बरीच राजकारणी मंडळी आणि इतर ही वेद आणि पुराणांमध्ये ब्रम्हास्त्र होते असा दावा सांगतात आणि सोबतच हे ब्रम्हास्त्र म्हणजे आत्ताचा अणुबॉम्ब आणि त्यामागचं astrophysics आहे असं सांगतात यावर तुमचं काय मत आहे?”

यावेळी नारळीकर म्हणाले, ” नक्कीचं वेदांमध्ये ब्रह्मस्त्राचा संदर्भ आहे म्हणजेच आपल्या पूर्वजांना nuclear physics ची संपूर्ण माहिती होती असे म्हणावे लागेल, पण nuclear physics माहिती होते असे आपण सरळ सरळ तर्क काढू शकत नाही त्यासाठी अजून काही मोठा पुरावा हवा. जर आपल्या पूर्वजांना nuclear physics माहिती होता तर त्यांना विद्युतचुंबकीय शास्त्र माहिती असायला हवेचं, आणि जर असे असेल तर त्यावेळी विजेचा वापर हा आजसारखाच सर्रास व्हायला हवा पण आपल्याला कुठेही याचे पुरावे आज उपलब्ध नाहीत. आणि या तर्कशुद्ध पुराव्यांच्या अभावामुळे आपल्याला असे मत मांडता येत नाही”

जयंत नारळीकर हे ज्येष्ठ वैज्ञानिक असून त्यांचे भारतीय विज्ञानाला मोठे योगदान आहे, ते त्यांच्या मराठीमधील विज्ञान पुस्तकांसाठी सगळीकडे प्रख्यात असून, सोप्या भाषेत विज्ञान समजवून सांगण्यात त्यांचा हातखंडा आहे.