Home महाराष्ट्र अजित पवारांनी पाठीत खंजीर खुपसलं; दिवसा-ढवळ्या शपथ का घेतली नाही? : संजय...

अजित पवारांनी पाठीत खंजीर खुपसलं; दिवसा-ढवळ्या शपथ का घेतली नाही? : संजय राऊत

0

आज अर्थात शनिवारी पहाटे राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोशियारी याच्या समक्ष फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या अश्या अचानक अनपेक्षित वागण्याने शिवसेनेच्या भावना दुखावल्या आहेत. विशेषतः शिवसेनेचे खासदार संजय राऊत संतापले आलेत दरम्यान पत्रकार परिषदेत सांगितले. ‘अजित पवार रात्री उशिरापर्यंत आमच्यासोबतच होते, पण त्यांच्या मनात वाईट विचार होते म्हणूनच आमच्या नजरेशी नजर मिळवू शकले नाहीत. काल अचानक वकिलांना भेटायला म्हणून ते जेचं गेले ते परत आलेच नाही, फोनही बंद करून ठेवला आता कळलं ते कुहल्या वकिलांना भेटायला गेले होते.

त्याच बरोबर राऊत म्हणले, ‘एक प्रकारे अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलं आहे. त्यामुळे जनता त्यांना कदापी माफ करणार नाही’ त्याच बरोबर भाजपा बद्दल बोलताना राऊत म्हणले ‘भाजपने महाराष्ट्राच्या जनेतचा पैसा, दिलेला कौल आणि जनतेच्या भावनांचा गैरवापर करून शपथ घेतली आहे. रात्रीच्या अंधारात वाईट कामे केली जातात, चोरी केली जाते डाका टाकला जातो तसेच यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ पण अंधारात घेतली आहे.’ असं म्हणत शपथ दिवसा-ढवळ्या  का घेतली नाही, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.

राजकीय वारे अनपेक्षित फिरले असून आता पुढे नक्की काय होईल याची शाश्वती नाही. सध्यातरी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस बहुमत सिद्ध करू शकतील का यावर आता सर्वांचे लक्ष वेधले आहे.