Home महाराष्ट्र “युतीने आता सरळ रामाच्या पादुका आणून मुख्यमंत्र्याच्या सिंहासनावर ठेवाव्या” : जितेंद्र आव्हाडांची...

“युतीने आता सरळ रामाच्या पादुका आणून मुख्यमंत्र्याच्या सिंहासनावर ठेवाव्या” : जितेंद्र आव्हाडांची टीका

0

दिवाळी आणि भाऊबीजेचा मुहूर्त मावळल्यानंतरही अद्याप मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित झालेलं नाही. राज्यात सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री पदावर आरूढ होण्यासाठी शिवसेना आणि भाजपामध्ये अगदी रस्सीखेच चालू आहे. सत्ता स्थापनेसाठी होत असलेला विरोध पाहता विरोधी पक्ष आणि जनतेकडून सत्ताधारी पक्षाला टीकेला सामोरं जावं लागत आहे. या चालू असणाऱ्या वादाचे ठसे वर्तमानपत्र आणि बातम्यांमधूनच नाही तर सोशल मीडियावरही उमटू लागले आहेत. याचाच आढावा घेत ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक उपाय सुचवत दणदणित टीका केली.

निवडणुकांची रणधुमाळी आवरून आता जवळपास आठवडा लोटला आहे तरी अजून सत्ता वाटप आणि मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित नाही. शिवसेना आणि भाजप यांच्यात चालू असलेल्या तिढ्यात जनता वेठीस धरली जात आहे; ज्याचा फायदा विरोधी पक्ष टीका करण्यासाठी करीत आहेत. त्यातच, रामराज्य आणू म्हणणाऱ्या भाजपालाही यावेळी आव्हाडांनी टोला लगावला आहे. त्यांचे ट्विट खालील प्रमाणे….

दरम्यान, मीडिया न्यूज नुसार राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार असा दावा करीत भाजपाने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह १३ मंत्रीपदांची ऑफर दिली आहे. तर मुख्यमंत्रीपदासह गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही खाती कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडेच राहतील असेही भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आता यावर शिकामोर्तब होणार की वाद हे वेळच सांगेल.