
कलर्स मराठीवर जितेंद्र जोशीचा ‘दोन स्पेशल’ हा कार्यक्रम प्रक्षेपित केला जातो. याच कार्यक्रमाचा एक एपिसोड सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या कार्यक्रमात एखाद्या व्यक्तीची कुणालाही ठाऊक नसणारी व जगासमोर नसलेली दुसरी बाजू दाखविण्याचा प्रयत्न केला जातो.
या कार्यक्रमात अनेक दिग्गज येऊन आपली मतं आणि भावना प्रकट करत असतात. दरम्यान या कार्यक्रमात जितेंद्र जोशीने सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग आणि मोठ्यांचा सन्मान न करणे याबाबत चीड व्यक्त केली आहे. त्यांनी ट्रोलर्समुळे आलेले वाईट अनुभवही सांगितले व सोबतच शरद पवार यांचा पावसात भिजून भाषण देतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा अनेकांनी चुकीची भाषा वापरून त्यांना ट्रोल केले याबाबत निंदा व्यक्त केली.
जितेंद्र जोशी म्हणतात, ‘मी शरद पवार यांचा पावसात भिजत भाषण देतांनाचा फोटो पाहिला. त्याच्यावर लोकांनी खाली आरे, तुरे लिहित कमेंट्स केल्या होत्या. अनेक वर्षे एका माणसाने काही काळ त्या क्षेत्रात घालवला आहे; त्याच्या विषयी आदराने तरी बोला.’